स्थायी समितीची सर्वसाधारण सभा 2 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 2 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह सिंधुदुर्गनगरी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आली आहे. 0000 जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा 2 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा गुरुवार दिनांक 2 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह सिंधुदुर्गनगरी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आली आहे. 0000 महिला व बालविकास समितीची सर्वसाधारण सभा 2 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास समितीची सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 2 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता बँ.नाथ पै. समिती सभागृह जिल्हा परिषद सिंधुदुर्गनगरी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आली आहे. 0000 पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 7 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आले आहे. 0000 पंचायत समिती वैभवाडीची मासिक सर्वसाधारण सभा 3 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - पंचायत समिती वैभवाडीची मासिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता पंचायत समिती वैभववाडी च्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. 0000 वृत्‍त क्रमांक-1157 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीची यादी संकेतस्थळावर जाहीर सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षा (NMMS) 2020-21 इयत्ता 8 वी साठी परीक्षा 6 एप्रिल 2021 रोजी घेण्यात आली होती. परीक्षेमधून शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी 18 ऑगस्ट 2021 रोजी परिषदेच्या www.mscepune.in व www.nmms.mscepunescholarshipexam.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे. असे एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे. 0000 वृत्‍त क्रमांक-1158 ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता पदी - नितीन उपरेलू सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथील कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा या पदाचा नितिन रमेश उपरेलू यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे. तरी कार्यालयाशी संबंधित असलेला गोपनिय, अर्धशासकीय व इतर पत्रव्यवहार खालील पत्यावर करण्यात यांवा. कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा,नितिन रमेश उपरेलू भ्रमणध्वनी क्रमांक 8055196477, कार्यालय दुरध्वनी क्रमांक- 02362 228094, कार्यालयीन ई-मेल eebnsindhudurg1@Gmail.com या पत्त्यावर पत्रव्यवहार करावा असे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे. 0000 वृत्‍त क्रमांक-1159 मुंबई येथे 116 वी डाक अदालत सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई व्दारा रोजी 29 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई यांचे कार्यालय मध्ये 116 वी डाक अदालत आयोजित केलेली आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधीत पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्य आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींचे या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल.विशेष: टपाल, स्पीड पोस्ट, काऊटर सेवा, डाक वस्तू, पार्सल बचत बँक व मनिऑडर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास पाठविली असेल त्यांचे नाव व हुद्दा इत्यादी. संबंधितानी डाक सेवेबातची आपली तक्रार एम. शात्नला भट्ट,सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज.शि) आणि सचिव.डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय मुंबई जी पी ओ इमारत, दुसरा माळा,मुंबई-400001 यांचे नावे दोन प्रतीसह दिनांक 10 सप्टेंबर 2021 पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. हे प्रपत्र महाराष्ट्र टपाल सर्कलच्या वेब साईट www.maharashtrapost.gov.in वर उपलब्ध आहे.असे माहिती अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभाग,सिंधुदुर्गनगरी यांनी कळविले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'