केंद्र शासनाच्या आयकर विभागाची खेळाडू भरती

सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का.) – केंद्र शासनाच्या आयकर विभागाव्दारे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी प्राविण्यधारक खेळाडूंकरिता विविध पदांच्या खेळाडू भरतीचा कार्यक्रम प्रसिध्द झाला आहे. भारतीय शालेय खेल महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत, महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू पात्र ठरणार आहेत. पात्र खेळाडूंना शालेय राष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धेमधील कामगिरी,संचालनालयाव्दारे प्रमाणित करुन देण्यात येणार आहे. राज्यातील कोविड 19 विषाणूंच्या प्रादुर्भावाचा विचार करता, खेळाडूंनी पुणे येथे व्यक्तीश: उपस्थित राहणे धोक्याचे ठरु शकते यासाठी राज्यातील शालेय राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी, विहित नमुण्यामधील फॉर्म -4 प्रामणित करुन घेण्यासाठी अर्ज 20 ऑगस्ट 2021 पुर्वी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत. त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे विजय शिंदे जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'