जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 1 हजार 545 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 358.1110 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.05 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 2.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर - 75.1720, अरुणा - 78.1636, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 1.8346, ओटाव – 2.2181, देंदोनवाडी – 0.4901, तरंदळे – 2.3960, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.4060, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2210, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 1.3910, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.3390, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7170, शिरगाव – 1.393, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000 वृत्त क्र.1096 जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.500 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.700 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुोलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.600 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'