जिल्ह्यात 3 लाख 29 हजार 44 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) - जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 29 हजार 44 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 834 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 673 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 911 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 264 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 98 हजार 685 व्यक्तींनी पहिला डोस तर 57 हजार 421 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 5 हजार 915 नागरिकांनी पहिला डोस तर 55 हजार 112 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 1 लाख 4 हजार 699 जणांनी पहिला डोस तर 13 हजार 577 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 4 लाख 70 हजार 91 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 4 लाख 64 हजार 800 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 3 लाख 38 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 26 हजार 320 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 3 लाख 43 हजार 824 कोविशिल्ड आणि 1 लाख 26 हजार 267 कोवॅक्सिन असे मिळून 4 लाख 70 हजार 91 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 27 हजार 150 लसी उपलब्ध असून त्यापैकी 24 हजार 70 कोविशिल्डच्या आणि 3 हजार 80 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 530 लसी शिल्लक असून त्यापैकी 270 कोविशिल्ड आणि 260 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'