मधकेंद्र योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या मधकेंद्र योजनेसाठी इच्छुक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती. जिल्ह्यात मधमाशापालनाला वाव असून बरेच लोक शेतीवर उपजीविका करतात. मधमाशा पालनामुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ होते. मध उद्योग हा केवळ शेतीपूरक व्यवसाय व जोड धंदा म्हणून न करता एक मुख्य उद्योग म्हणून केल्यास त्यातून ग्रामीण रोजगार निर्मितीला चालना मिळेल. मधमाशांच्या पेट्या शेती व फळबागायतीच्या ठिकाणी तसेच जंगलात ठेवल्यास मधमाशांद्वारे परागीभवन होऊन पिकाच्या उत्पादनात 5 ते 45 टक्के वाढ होते. कोकण विभागातील जंगल व फळबागांची क्षेत्र अशी वैशिष्ट्येपूर्ण निसर्ग संपदा असल्याने मध उद्योगाच्या विकासाला वाव आहे. वैयक्तीक मधपाळ आणि केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ हे या योजनेतील प्रमुख घटक आहेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, कुडाळ दूरध्वनी क्रमांक 02362-222220 तसेच 9420962105 येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'