भाडे तत्वावर इमारत देण्यास इच्छुक मालकांनी संपर्क साधावा
सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का): इतर मागास बहुजन कल्याण संचालनाल विभागाकडून इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात मुलींसाठी वसतीगृह तातडीने सुरु करावयाचे आहे. या वसतीगृहाकरीता सुसज्ज अशी खासगी इमारत भाडे तत्वावर घेण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक संतोष चिकणे यांनी दिली आहे.
इमारतीची खोल्यांची रचना १) विद्यार्थी निवासी दालन कक्ष प्रतिविद्यार्थी ४० चौ.फुट x१०० विद्यार्थी- ४००० चौ. फुट, २) स्वयंपाकगृह- ८०० चौ.फु. ३) भोजनकक्ष - ८०० चौ.फू., ४) मनोरंजन कक्ष- ३०० चौ.फु. ५) वाचनालय- २०० चौ.फु., ६) संगणक कक्ष- ३०० चौ.फु. ७) स्टोअर रुम-५०० चौ.फु., ८) कार्यालय- १५० चौ.फु., ९) गृहपाल निवासी- ३०० चौ.फु. १०) अभ्यासिका २०० चौ.फु., ११) स्वच्छतागृह- १००० चौ.फु.. १२) अभ्यांगतगृह - २०० चौ.फु., १३) पार्किंग / सायकल स्टॅन्ड ३०० चौ.फु. असे एकूण जागा ९२०० चौ. फुट शासकीय मुलींच्या वसतिगृहाकरीता १०० क्षमतेच्या खाजगी इमारतीमध्ये आवश्यक आहे.
जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी (ओरोस) किंवा कुडाळ या शहराच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तरी भाडे तत्वावर इमारत देण्यास इच्छुक असतील अशा इमारत मालकांनी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सिंधुदुर्ग या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन संतोष चिकणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८८२ संपर्क साधावा.
००००००
Comments
Post a Comment