एजंट किंवा संघटनांशी आर्थिक व्यवहार न करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का): बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत जिवित (सक्रीय) बांधकाम कामगारांना सुरक्षा संच, अत्यावश्यक संच व गृह उपयोगी वस्तूसंच (भांडी वाटप) करण्यात येत असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी संदेश आयरे यांनी दिली आहे. शासनामार्फत नियुक्ती करण्यात आलेली कंपनी मे. मफतलाल इंडस्ट्रिज लि. यांच्या मार्फत विनामुल्य संचाचे वाटप करण्यात येत आहे. तसेच संच प्राप्ती करता काही कामगार हे एजंट, व्यक्ती किंवा संघटना यांच्याशी आर्थिक व्यवहार करीत असल्याचे समजत आहे. या कार्यालयामार्फत असे सूचीत करण्यात येते की, कामगारांनी अशा कोणत्याही व्यक्ती, एजंट किंवा संघटना यांच्याशी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये, जर अशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारातून फसवणूक झाल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार रहाणार नाही. तरी अशा फसवणूकीबाबत तक्रार असल्यास नजीकच्या पोलीस स्थानकाशी सर्पक करून रितसर तक्रार दाखलकरण्यात यावी. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारीयांनी केले आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'