विनानुदानित तत्त्वावर नोंदणी प्रमाणपत्र प्रस्तावाबाबत आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का): बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील तरतुदीनुसार, महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे विशेष दत्तक संस्था (specialsed Adoption Agency) या योजनेकरिता सिंधुदुर्ग, नंदुरबार हिंगोली, जालना व यवतमाळ या पाच जिल्ह्यांसाठी विनानुदानित तत्त्वावर नोंदणी प्रमाणपत्र प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. ही जाहिरात आयुक्त, महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्फत https:// www.wodcommpune.com या संकेतस्थळावर दि. 17 जुलै 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी इच्छुक संस्थांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांचे कार्यालयात जाहिरात संकेतस्थळावर प्रसिध्द झालेपासून 15 दिवसांचे आत प्रस्ताव सादर करावेत. या प्रस्तावाच्या अर्ज, अटी / शर्ती विषयी अधिक माहिती www.maharashtra.gov.in व https://www.wedcommpune.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच अधिक माहितीसाठी या कार्यालयाच्या 02362 228869 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'