पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान
सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का): राज्यातील अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी शासन स्तरावरुन अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यास अल्पसंख्याक विद्यार्थी बहूल शासनमान्य खाजगी अनुदानित/ विना अनुदानित शाळा/ कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामध्ये किमान 70 टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी (मुस्लिम, ख्रिश्चन,शिख,बौध्द, पारसी,जैन) शिक्षण घेत आहेत तसेच अपंगाच्या शाळांमध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी (मुस्लिम, ख्रिश्चन,शिख,बौध्द, पारसी,जैन) शिक्षण घेत आहेत अशा शाळा/ संस्था पात्र असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील इच्छुक शाळांनी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांच्यामार्फत जिल्हा नियेाजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे दि. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावेत. विहित अर्जाचा नमुना याबाबतचा अधिक तपशील अल्पसंख्यांक विकास विभागांच्या शासन निर्णय दि. 7 /10/2015 मध्ये उपलब्ध आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांची दखल घेण्यात येणार नाही.
००००००
Comments
Post a Comment