पणजी येथे पोस्टल पेन्शन अदालतींचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.24 (जि.मा.का): पोस्टमास्तर जनरल क्षेत्रीय कार्यालय गोवा, पणजी यांच्या कार्यालयामध्ये टपाल विभागातील पेन्शन धारकांसाठी 7 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3 वाजता पोस्टल पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी दिली आहे. पोस्टाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृती वेतनसंबंधी तक्रारींचे प्रामाणिकपणे निवारण करण्यासाठी डाक विभाग क्षेत्रीय कार्यालय गोवा (ज्यामध्ये गोवा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.) डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन पेन्शन संबंधी ज्या तक्रारींचे निवारण 3 महिन्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा सर्व तक्रारींची या डाक पेन्शन अदालत मध्ये दखल घेतली जाईल. कायदा संबंधित प्रकरणे उदा. उत्तराधिकार तसेच धोरणात्मक स्वरुप संबंधित तक्रारी पेंन्शन अदालत मध्ये विचारत घेतली जाणार नाहीत. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलांसह केलेला असवा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यांस मुळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी संबंधितांना पेंशन बाबतची आपली तक्रार श्री.महेश एन वरिष्ठ लेखाधिकारी/ सचिव अतिरिक्त प्रति सह दिनांक 26 जुलै 2024 अथवा तत्पुर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी यानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर पेन्शन अदालत मध्ये विचार करण्यात येणार नाही. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'