नवीन रास्तभाव दुकानांसाठी 27 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का): राष्टीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 च्या कलम 12(2)(ई) मधील तरतूदनुसार पंचायती स्वयंसहाय्यता गट, सहकारी संस्था यांसारख्या सार्वजनिक संस्थांना किंवा सार्वजनिक न्यासांना रास्तभाव दुकानांचे परवाने देण्यास प्राथम्य देणे आणि महिला किंवा त्यांच्या समुदायाद्वारे दुकानांचे व्यवस्थापन करणे. त्यानुसार सध्याची रास्तभाव दुकाने, किरकोळ केरोसिन परवाने तसेच ठेवून आजमितीस रद्द असलेली किंवा यापुढे रद्द होणारी, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाची नवीन रास्तभाव दुकाने व किरकोळ केरोसिन परवाने प्राथम्यक्रमानुसार मंजूर करण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. तरी विहीत नमुन्यामधील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 27 ऑगस्ट 2024 पर्यंत संबंधित तालुक्याच्या तहसिलदार यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे यांनी केले आहे. रास्त भाव धान्य दुकाने मंजुरीसाठी प्राथम्यक्रम - पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अंतर्गत नौदणीकृत सहकारी संस्था आणि संस्थानौदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास. वरील प्राथम्यक्रमानुसार रास्तभाव दुकान परवाने मंजूर होणाऱ्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायां‌द्वारे करु शकणाऱ्या संस्थांचीच निवड करणे आवश्यक राहील. शासन परिपत्रक अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक राभादु-२११७/प्र.क्र.१५७/नापु-३१ दि. २/२/२०२२ अन्वये जाहीरनामा प्रसिध्द करण्यासाठी सुधारीत सहामाही कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यास अनुसरुन वर्षातून २ वेळा म्हणजेच १ जानेवारी व १ जुलै रोजी दरवर्षी जाहीरनामा प्रसिध्द करावयाचे निर्देश देण्यत आलेले आहेत. परंतू कोण पदवीधर मतार संघाच्या निवडणूकीची आचारासंहिता असल्याने दि. १ जूलै २०२४ रोजी जाहीरनामा प्रासिध्द करण्यात आलेला नाही. शासनाकडील पत्र क्र.कालब १२२४/प्र.क्र.१०३/ना.पु.३१ दि. १०/७/२०२४ चे पत्रान्वये जाहीरनामा प्रसिध्द करण्यास मंजुरी दिलेली आहे. जिल्हयातील सर्व तालुक्यांतील पुढील गावांसाठी केवळ रास्तभाव दुकाने परवाने मंजुरीकरीता दि. २९ जुलै २०२४ रोजी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येत आहे. अ.क्र तालुका रास्त भाव धान्य दुकान परवाना मंजूर करावयाची गावे 1 सावंतवाडी सावंतवाडी ई वॉर्ड, सावंतवाडी ई १ वॉर्ड, कोंडुरे 2 दोडामार्ग निरंक 3 वेंगुर्ला निरंक 4 कुडाळ मुगणी, कविलगांव, रुमडगांव, कुडाळ नं.१, मिटक्याचीवाडी 5 मालवण बांदीवडे, आंबेरी, गोठणे, नांदरुख, खरारे, मालवण वॉर्ड नं.१, ओवळीये, खोटले, तारकर्ली. 6 कणकवली कुंभवडे, ओझरम, वारगांव, तळवडे, 7 देवगड दाभोळे, गढीताम्हाणे, लिंगडाळ, मिठमुंबरी, नाद, पाटगांव, पेंढरी, सांडवे. 8 वैभववाडी भोम गुरववाडी या जाहीरनाम्यास अनुसरुन व प्राथम्यक्रमानुसार त्या गावातील/ क्षेत्रातील पंचायत, बचत गट, सहकारी संस्था यांनी विहीत नमुन्यामधील अर्ज आवश्यक त्या पुढीलप्रमाणे कागदपत्रांसह दिनांक २७ ऑगस्ट २०२४ पर्यंत संबंधित तालुक्याच्या तहसिलदार यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. अर्जासोबत जोडावयाचे कागदपत्र/अटी व शर्ती अर्जाचे कोरे नमुने रक्कम रु. १०/- तहसिलदार कार्यालयात जमा केल्यावर संबंधित तहसिलदार कार्यालयाच्या पुरवठा शाखेतून उपलब्ध होतील. अर्जदार ज्या गावातील परवान्यासाठी अर्ज सादर करणार आहे त्याच गावातील/क्षेत्रातील रहिवासी असावा. विहीत केलेल्या दिनांकापूर्वी प्राप्त झालेल्या अर्जाचाच छाननीसाठी विचार केला जाईल. विहीत दिनांकानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. यासाठी संबंधित तहसिलदार यांनी अर्जदार यांस पोहोच देऊन अर्जावर दाखल तारीख घालावी. अर्जावर संस्था प्रमुख व संस्थेचे सचिवाची सही असणे आवश्यक आहे. अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे. (अ) अर्जदार जेव्हा ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था असेल तेव्हा ग्रामपंचायत/तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था असेल तेव्हा ग्रामसभा/ग्रामपंचायत ठरावाची प्रत. सर्व सदस्यांचे निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत, त्यांचे नावाचे यादीसह. ग्रामपंचायत/तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था याचे आर्थिक व्यवहार व लेखे अद्ययावत असलेबाबत पुरावा बँकेचे पासबुकची झेरॉक्स प्रत. ज्या ठिकाणी परवान्यानुसार दुकान चालविणार आहेत, त्या जागेच्या मालकी हक्काचा पुरावा. यात ग्रामपंचायतीकडील नमुना आठ अ / सातबारा उतारा/नगर भूमापन विभागाकडील मिळकतीचा उतारा तसेच, जागा भाड्याची असल्यास रुपये २००/- च्या स्टॅम्प पेपरवरील जागा मालकाचे संमत्तीपत्र. (ब) अर्जदार जेव्हा नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट असतील तेव्हा स्वयंसहाय्यता बचत गट अस्तित्वात व कार्यरत असल्याबाबत संबंधित प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अथवा संबंधित गटविकास अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र. स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्यांची यादी व शैक्षणिक पात्रता दर्शविणारा पुरावा. स्वयंसहाय्यता बचत गटाचे सभासद दारिद्रय रेषेखालील असल्यास त्याबाबतचा पुरावा. स्वयंसहाय्यता बचत गटाच्या आर्थिक व्यवहारांचे हिशोब व लेखे अद्ययावत असलेबाबत पुरावा. मागील ३ वर्षांचे ताळेबंद व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत. स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत सदस्यांचे स्वयंघोषणापत्र. स्वयंसहाय्यता बचत गट किंवा स्वयंसहाय्यता बचत गटाच्या सदस्य-पदाधिकाऱ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल नसलेबाबत स्वयंसहाय्यता बचत गटाचे स्वयंघोषणापत्र. स्वयंसहाय्यता बचत गटाच्या नावे अन्यत्र कोठेही शिधावाटप दुकान कार्यान्वित नसलेबाबत स्वयंघोषणापत्र. प्रस्तावित दुकानाच्या जागेसंबंधी/ बांधकामाच्या वैधतेसंबंधी इतर तत्सम बाबींसाठी कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या नियमांचा/केंद्रशासनाच्या काय‌द्यांचा भंग झाल्यास दुकान विनाविलंक/विनानोटीस रद्द करण्यात येईल ही अट मान्य असल्याबाबत स्वयंघोषणापत्र. परवान्याची जागा निवासी असल्यास संबंधित गृहनिर्माण संस्था अगर तत्सम प्राधिकरणाच्या निवासी जगेतील शिधावाटप दुकान परवान्यासाठी नाहरकतीबाबत स्वयंघोषणापत्र. ज्या ठिकाणी परवान्यानुसार दुकान चालविणार आहेत, त्या जागेच्या मालकी हक्काचा पुरावा, यात ग्रामपंचायतीकडील नमुना आठ अ/ सातबारा उतारा/नगर भूमापन विभागाकडील मिळकतीचा उत्तारा तसेच, जागा भाड्याधी असल्यास रुपये २००/- च्या स्टॅम्प पेपरवरील जागा मालकाचे संमत्तीपत्र. संबंधित ग्रामपंचायतीचा स्वयंसहाय्यता बचत गटाने परवाना घेण्यास मंजूरीबाबतचा ठराव. सभासदांना वाटप केलेल्या कर्जाच्या तपशिलाबाबत सद्यस्थितीदर्शक पुरावा. स्वयंसहाय्यता बचत गटाकडे खेळते भांडवल असलेबाबत पुरावा. स्वयंसहाय्यता बचत गटाने/ सदस्यांनी बँकेकडून कर्ज घेतले असल्यास, सदर कर्ज हप्ते परत फेडीबाबतच्या सद्यस्थितीचा पुरावा. स्वयंसहाय्यता बचत गटाकडून सध्या करणेत येत असलेल्या व्यवसायांबाबत माहिती. स्वयंसहाय्यता बचत गट रास्त भाव धान्य दुकान परवाना चालविण्यास इच्छुक असलेबाबत बचत गटाच्या सदस्यांचा ठराव. रास्त भाव धान्य दुकान परवाना मिळाल्यास स्वयंसहाय्यता बचत गट परवाना एकत्रित रित्या चालविणार असून, अन्य कोणासही परवाना चालविण्यास देणार नसलेवावत/ परवाना हस्तांतरीत करणार नसल्याबाबत गटाच्या सदस्यांचे प्रतिज्ञापत्र. संबंधित ग्रामपचायतीचा स्वयंसहाय्यता बचत गटाने परवाना घेण्यास मंजूरीबाबतचा ठराव. ५(क) अर्जदार जेव्हा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, किंवा संस्थानोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास असतील तेव्हा, सहकारी संस्था यातील सर्व सदस्यांची यादी. सहकारी काय‌द्याच्या अंतर्गत नोंदणी झाल्याबाबत जिल्हा उपनिबंधक यांचे प्रमाणपत्र. संस्थेचे आर्थिक व्यवहार व लेखे अ‌द्ययावत असलेबाबत पुरावा. मगिल ३ वर्षाचे ताळेबंद व बँकेचे पासबुकची झेरॉक्स प्रत. सहकारी संस्थेतील सदस्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत सदस्यांचे स्वयंघोषणापत्र. सहकारी संस्थेवर किंवा संस्थेच्या सदस्य-पदाधिकाऱ्यावर कोणतेही गुन्हे दाखल नसलेबावत संस्थेचे स्वयंघोषणापत्र. प्रस्तावित दुकानाच्या जागेसंबंधी/ बांधकामाच्या वैधतेसंबंधी इतर तत्सम बाबींसाठी कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या नियमांचा केंद्रशासनाच्या कायद्यांचा भंग झाल्यास दुकान विनाविलंब/विनानोटीस रद्द करण्यात येईल ही अट मान्य असल्याबाबत स्वयंघोषणापत्र. परवान्याची जागा निवासी असल्यास संबंधित गृहनिर्माण संस्था अगर तत्सम प्राधिकरणाच्या निवासी जागेतील शिधावाटप दुकान परवान्यासाठी नाहरकतीबाबत स्वयंघोषणापत्र. ज्या ठिकाणी परवान्यानुसार दुकान चालविणार आहेत, त्या जागेच्या मालकी हक्काचा पुरावा. यात ग्रामपंचायतीकडील नमुना आठ अ / सातबारा उतारा/नगर भूमापन विभागाकडील मिळकतीचा उत्तारा तसेच, जागा भाड्याची असल्यास रुपये २००/- च्या स्टॅम्प पेपरवरील जागा मालकाचे संमत्तीपत्र. संबंधित ग्रामपंचायतीचा सहकारी संस्थेने परवाना घेण्यास मंजूरीबाबतचा ठराव. संस्थेकडे खेळते भांडवल असलेबाबत पुरावा. संस्थेकडून सध्या करणेत येत असलेल्या व्यवसायाबाबत माहिती. संस्था रास्त भाव धान्य दुकान परवाना चालविण्यास इच्छुक असलेबाबत सहकारी संस्थेच्या सदस्यांचा ठराव. किरकोळ केरोसिन परवान्यासाठी अर्ज करताना, केरोसिन साठविण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध असलेबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. सदरचा जाहीरनामा शासन निर्णय क्र. राभादु/ १७१६/प्र.क्र.२३९/नापु-३१, दिनांक ०६-०७-२०१७ व शासन परिपत्रक क्रमांक राभादु-२११७/प्र.क्र.१५७/नापु-३१, दि.०२-०२-२०२२ मध्ये दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून तसेच या कार्यालयाकडील उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिध्द करण्यात येत आहे. या माहितीमध्ये कोणताही बदल झाल्यास हा जाहीरनामा कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याबाबतचे अधिकार या कार्यालयाने राखून ठेवले आहेत. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'