विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 16 : ऑटो रिक्षा-टॅक्सी, विविध संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रति दिवस 50 रुपये एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होते. या विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती देण्यात येत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे. परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाच्या प्रतिदिन रू. 50 शुल्क आकारणी संदर्भात विलंब शुल्कामधून सुट देण्यासाठी ऑटोरिक्षा टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहन धारकांच्या संघटनांकडून शासनाकडे निवेदने प्राप्त झाली आहेत. शासनाने वाहनधारक व विविध संघटनाच्या निवेदनांचा व मागणीचा सहानुभुतीपुर्वक विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्तावास मान्यता दिली व त्यास अनुसरून प्रभारी मंत्री (परिवहन) यांनी दि. 11 जुलै 2024 रोजी विधानसभा सभागृहात निवेदनाव्दारे 15 वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन रुपये 50 एवढे विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. तरी सर्व वाहनधारकांनी याची नोद घ्यावी व आपली वाहने योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदूर्ग येथे सादर करावीत. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'