मुख्यमंत्री वयोश्री योजनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.24 (जि.मा.का): राज्यातील 65 वर्षे व त्यावरील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाय योजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधणे/ उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. या योजनेतंर्गत लाभार्थी व्यक्ती वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील, असे नागरिक पात्र समजण्यात येतील. लाभार्थी पात्रतेसाठी कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य/ केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करु शकतो. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.2 लाखाच्या आत असावे. या व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारव्दारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तसेच उपकरण विनामुल्य प्राप्त केले नसावे. पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तीक आधार संलग्न बचत खात्यात रु.3000/- थेट लाभ वितरण करण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी अर्ज सादर करण्याकरीता सहायक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी या कार्यालयाशी संपर्क साधावा. योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'