डाक विभागाच्या वतीने 'डाक मेळाव्याचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, दि.१८ (जि.मा.का): 'डाक सेवा जन सेवा' अंतर्गत डाक विभागामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सेवा, सुविधा व बचत योजनांची माहिती व त्याचा लाभ ग्रामीण भागातील सर्व नागरिकाना त्याच्या गावातच घेता यावा, यासाठी डाक विभागाच्या वतीने 'डाक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डाक विभागाच्या अल्प बचत योजना, आधार सेवा, लहान मुलांची नवीन आधार नोंदणी, इंडिया पोस्ट पेमेंट बैंक, टपाल जीवन विमा अशा सर्व सेवाची माहिती व योजनेचा तत्काळ लाभ विविध गावातील नागरिकांना घेता येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभाग डाकघर अधीक्षक यांनी दिली आहे.
शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनाचा लाभ गावातील गरजू व इच्छुक लोकाना मिळावा यासाठी सिंधुदुर्ग डाक विभागाद्वारे जिल्ह्यात जुलै २०२४ या महिन्यात विविध ठिकाणी 'डाक मेळावे पुढीलप्रमाणे आयोजीत करण्यात आले आहेत. या मेळाव्यांच्या ठिकाणी विशेषकरून सध्या महाराष्ट्र शासनाने घोषीत केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने' चे पैसे जमा होण्यासाठी महिलाची 'शून्य रक्कमेने' पोस्टाची बचत खाती काढता येणार आहेत, पासबुक त्वरित खातेदारास देण्यात येईल.
सिंधुदुर्ग विभागात पावशी ता. कुडाळ येथे १८ जुलै २०२४, मालवण प्रधान डाकघर येथे २० जुलै २०२४, सावंतवाडी प्रधान डाकघर येथे २२ जुलै २०२४, बोर्डवे येथे २३ जुलै २०२४, अचिर्णे ता. वैभववाडी येथे २४ जुलै २०२४, तळवडे ता. सावंतवाडी येथे २५ जुलै २०२४ व आदुर्ले ता. वेगुर्ले येथे २५ जुलै २०२४ रोजी डाक मेळावे आयोजीत करण्यात आले आहेत.
तरी डाक विभागाच्या या अभिनव उपक्रमाचा जिल्ह्यातील सर्व लोकानी डाक विभागाच्या सेवा व योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, अधिक माहितीकरिता नजीकच्या डाकघराशी संपर्क साधावा. असे आवाहन डाक अधीक्षक यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment