कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह) इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील आर्थिक कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांना कन्यादान योजना सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत विवाह सोहळ्यामध्ये अनाठायी खर्च करणे व त्यासाठी प्रसंगी कर्जबाजारी होणे व त्यामुळे आर्थिक समस्येच्या खाईत लोटले जाणे, हे प्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, विजाभज (धनगर व वंजारीसह) विशेष मागास प्रवर्गातील आर्थिक कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटूंबातील सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होवून विवाह करणाऱ्या दांपत्यांना शासन निर्णयानुसार कन्यादान योजना सुरु करण्यात आली आहे. कन्यादान योजनेचे निकष सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या मागासवर्गीय दांपत्यांना वस्तु स्वरुपात देण्यात येणाऱ्या अनुदान रु.20,000/- इतकी रक्कम वधूचे वडील, आई किंवा पालकांच्या अधोरेखित धनादेशाव्दारे (क्रॉस चेकने) लग्नाच्या दिवशी देण्यात यावी. सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या पात्र स्वयंसेवी संस्थांना प्रती जोडप्यामागे रु. 4000/- प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात यावे. यासाठी 3 महिन्यांच्या आत विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. विवाह नोंदणी झाल्यानंतर रक्कम अधोरेक्षित धनादेशाव्दारे देण्यात येईल. या सामुहिक विवाह सोहळ्याकरिता किमान 10 जोडपी असणे आवश्यक राहील. या योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठी आहे. तथापि विधवा महिलेस दुसऱ्या लग्नाकरिता सुध्दा अनुज्ञेय राहील. स्वयंसेवी संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असली पाहिजे. तसेच अर्ज सादर करताना सदरहू नोंदणी प्रभावी असली पाहिजे. त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्था यांच्या विरुध्द कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदविला किंवा न्यायालयीन प्रकरण नसले पाहिजे. 00000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'