मिनी ट्रॅक्टर व शेती उपयोगी उपसाधणांचा पुरवठा

सिंधुदुर्गनगरी : सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व शेती उपयोगी उपसाधनांचा पुरवठा करण्यात येतो. जिल्ह्यातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील बचतगटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील बचत गटांना मिनीट्रॅक्टर व शेती उपयोगी उपसाधने बचत गटाचे उत्पन्न वाढावे या हेतूने देण्यात येत आहे. अशा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील बचतगटांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रांसह सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोस्ट कार्यालयाच्या समोर सिंधुदुर्गनगरी यांच्याकडे संपर्क साधावा. अर्जासोबत पुढीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. बचतगटाचे नोंदणी प्रमाणपत्र. स्वयंसहाय्यत्ता बचतगटांतील 80 टक्के सदस्य हे अनूसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत व ते महाराष्ट्रातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.बचतगटांतील सदस्यांची यादी व पुर्ण नाव, पत्ता, जात व संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक. बचतगटांतील मागासवर्गीय सदस्यांचे जातीचे दाखले, रेशन कार्ड झेरॉक्स प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. बँक खाते पासबुक ची झेरॉक्स प्रत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3,50,000/ इतकी असून स्वयंसहाय्यता बचतगटाने वरील कमाल मर्यादा रक्कमेच्या 10 टक्के रक्कम रु. 35,000/ स्वहिस्सा करण्याचा आहे. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'