डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का): अल्पसंख्यांक विकास विभागाकडून डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत असून इच्छुक मदरशांनी 15 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.
राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरशांनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करुन सन 2024-25 या वर्षाकरीत विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे दि. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत. विहित अर्जाचा नमुना याबाबतचा अधिक तपशील शासन निर्णय दि. 11/10/2013 मध्ये उपलब्ध आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांची दखल घेण्यात येणार नाही.
०००००
Comments
Post a Comment