यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी : समाज कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत काढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, यासाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुधारीत करुन योजना नव्याने राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे.
या योजनेचे लाभ घेण्यासाठीचे निकष पुढीलप्रामणे
लाभार्थी धनगर कुटुंबातील भटक्या -क या मुळ प्रवर्गातील असावा. लाभार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1.20 लक्ष पेक्षा कमी असावे. लाभार्थी कुटुंबाचे स्वत: चे मालकीचे घर नसावे. लाभार्थी कुटुंब हे भूमिहीन असावे. लाभार्थी हा महाराष्ट्र्र राज्याचा अधिवासी असावा. लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र्र राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. या योजनेचा लाभ पात्र कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येईल. लाभार्थी वर्षभरात 6 महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा. तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment