माजी सैनिकांकरीता मालवण येथे मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का): जिल्ह्यातील नेव्हीमधून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या निवृत्तीवेतन व त्यासंबंधी इतर काही अडीअडचणींचे निरसन करण्यासाठी दि. 13 जुलै 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता मालवण येथील सैनिकी विश्रामगृह येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहा. सैनिक जिल्हा कल्याण अधिकारी यांनी केले आहे. आय एन एस आंग्रे मुंबई यांच्या मार्फत राज्यातील 32 जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांना व समुद्र किनारपट्टीतील भागांना भेटी देण्यासाठी maha connect या नावाने कॉर रॅलीचे आयोजन केले आहे. या कॉर रॅलीचे सुरुवात मुंबई येथून होणार असून त्यामध्ये नेव्हीतील 12 अधिकारी व 4 जवानांचा समावेश आहे. या रॅलीचे आगमन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी विश्रामगृह येथे होणार आहे. जिल्ह्यातील नेव्हीमधुन निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी/ त्यांच्या विधवा पत्नी यांनी आपले सैन्यसेवा पुस्तक, माजी सैनिक ओळखपत्र, पीपीओ व बँक पासबुक या कागदपत्रांसह दि. 13 जुलै 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता सैनिकी विश्रामगृह मालवण येथे उपस्थित राहाण्याचे आवाहन सहा. सैनिक जिल्हा कल्याण अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय दूरध्वनी क्रमांक 02362 228820/9420300620 वर संपर्क साधावा. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'