५५ वी पोस्टल पेन्शन अदालत
सिंधुदुर्गनगरी, दि.24 (जि.मा.का): टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी/ कुटुंब निवृत्तवेतनधारकांसाठी 55 वी पोस्टल पेन्शन अदालत दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल,मुंबई येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागा चे अधीक्षक डाकघर यांनी दिली आहे.
निवृत्तीवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत. ज्यांची सेवेत असताना मृत्यु झालेली आहे. टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तिवेतनधारक ज्यांचे 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालत मध्ये विचार केला जाईल.
पेन्शन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्द्यांसह प्रकरणे. वारस प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन टीबीओपी/ एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबीसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणाचा विचार केला जाणार नाही. निवृत्तिवेतनधारक आपले अर्जाचे तिन प्रति, लेखा अधिकारी अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, न्यु एनेक्स भवन, चौथा मजला मुंबई-400001 ला 31 जुलै 2024 रोजी किंवा यापूर्वी वैयक्तिक रुपाने (तक्रारीची मोठ्या प्रमाणात/ इतरांच्या वतीने नाही ) पाठवू शकता. या नंतरचा अर्जावर विचार करण्यात येणार नाही.
००००००
Comments
Post a Comment