नवभारत साक्षरता कार्यक्रमाची बैठक संपन्न
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 16 : केंद्र पुरस्कृत उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, यांच्या मार्गदशनासुसार आज रोजी शिक्षणाधिकारी (योजना) प्रदीपकुमार कुडाळकर, यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीसाठी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, सचिव गुरुदास कुसगावकर, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष गजानन नानचे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय पेंडूरकर व सचिव अभिजित जाधव, शिक्षक भारती संघटनेच अध्यक्ष संजय वेतुरेकर, मराठा शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश म्हाडगुत आणि माध्यमिक अध्यापक संघाचे अशोक गिते तसेच उपशिक्षणाधिकारी (योजना) निलीमा नाईक उपस्थित होते.
बैठकीमध्ये नव साक्षरता कार्यक्रम शासन निर्णय तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिलेले असाक्षरांचे उद्दिष्ट याबाबत चर्चा झाली. बैठकीमध्ये नव भारत साक्षरता कार्यक्रम हे राष्ट्रीय कामकाज असल्याने या कार्यक्रमाचे काम उद्दिष्टांनुसार पूर्ण करण्याबाबत सर्वानुमते सहमती दर्शविली. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे विशेष आभार व अभिनंदन. अशी माहिती शिक्षणाधिकारी (योजना) प्रदीपकुमार कुडाळकर यांनी दिली.
००००००
Comments
Post a Comment