"स्टॉप डायरिया" अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.10 (जि.मा.का): जलजन्य आजार रोखण्याचा लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने दिनांक 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या कालवधीत स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येत असून जिल्ह्यातील प्रत्येक गावात हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्हावासियांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये शुद्ध पाणी निर्जंतुकीकरण करून पिल्यामुळे जलजन्य आजार होणार नाहीत. जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हात 1 जुलै ते 31 ऑगस्ट या दरम्यान स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये गावातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी कार्यालये व प्राथमिक शाळा येथील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया, गैस्ट्रों व कावीळ यासारखे अनेक आजार होत असतात त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येणार आहे. यासाठी गाव स्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांच्यामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. एकूण आठ आठवडे हे अभियान चालणार असून प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या वेगवेगळे उपक्रम गाव पातळीवर घेण्यात येणार आहेत. अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. या कार्यशाळेमध्ये पाणी शुद्ध करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येणार आहे व शुद्ध पाण्याचे महत्व सांगण्यात येणार आहे. या अभियानामध्ये मुख्यतः पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन व त्याची योग्य हाताळणी, स्वच्छता जागृती कार्यक्रम, पाणी गळतीच्या जागा शोधून त्याची दुरुस्ती करणे, पाणी तपासणीबाबत गाव पातळीवर पोस्टर बैनर्स लावण्यात येणार आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता चावडी सुरू करण्यात येणार आहे. गावातील शाळा अंगणवाड्या प्राथमिक आरोग्यकेंद्रे येथे स्वच्छता जागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ग्रामस्थांमध्ये कचऱ्याच्या वर्गीकरणाच्याबाबतीत जागृती निर्माण करणे यासाठी घरोघरी भेटी देऊन, कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास प्रोत्साहन देणे यामध्ये जैविक व अजैविक कचरा यासाठी स्वतंत्र बकेटमध्ये ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. अंगणवाड्यामध्ये माता व किशोरी मुलीची स्वच्छता आरोग्य इत्यादी विषयावर मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा योजनेतील पाणी गळती शोधून त्याची दुरुस्ती करणे पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे. घरगुती स्तरावरील पाणी साठवणुकीच्या टाक्यांची स्वच्छता करणे नादुरुस्त शौचालयाची दुरुस्ती करण्याची मोहीम प्रागपंचायत ने हातात घेऊन शाळा अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी शौचालयांची नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करणे. प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छता विशेष विशेष स्वच्छता संमेलन भरवण्यात यावे यामध्ये विद्यार्थी शिक्षक यांचे मध्यान भोजन यासाठीची स्वच्छता व स्वच्छते बदल जागृता सत्र घेण्यात येणार आहे तसेच तरोध गावामध्ये में वॉटर ग्रे बॉटर मॅनेजमेटबाबत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये विशेष करून प्रत्येक सेप्टिक टँक असलेल्या शौचालयांना शोषखड्डा तयार करणे घरातील सांडपाणी परसबाग किंवा शोषखड्डा करून त्यातच सोडणे हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याचे खोतांची स्वच्छता ठेवणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतायाबाबत गावांना सक्षम करण्यासाठी गावातील सर्व घटकांचा या अभियानामध्ये सहभाग घेण्यात येणार आहे. छतावरील पाऊस पाणी संकलन करून पावसाचे पाणी साठवण्याच्या तंत्राबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्र/जलस्रोत इत्यादी भोवती स्वच्छता आणि स्वच्छता मोहीम राबविणेत येणार आहे. शालेय स्तरावरील चित्रकला, निबंध लेखन, घोषवाक्य लेखन स्पर्धा हि अतिसाराचा सामना करण्यासाठी सुरक्षित पाण्याचा वापर या विषयावर आयोजन करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांना सुरक्षित पाणी वापराच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. स्टॉप डायरिया अभियान गाव पातळीवर यशस्वीपणे राबविण्यात यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'