सहकार खात्यातून निवृत्त अधिकाऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.10 (जि.मा.का): महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/ प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी सहकार खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी (वयाची 65 वर्षे पूर्ण न झालेल्या) निवृत्त न्यायाधीश, वकील, चार्टड अकाऊटंड यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था माणिक सांगळे यांनी दिली. अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग व अधिनस्त सर्व तालुका उपनिबंधक/ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकार्यालयात दि. 1 ते 31 जुलै 2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. या अर्जासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरवा, जन्मतारीख पुरावा, शैक्षणिक अर्हतेसंबधी कागदपत्रे (पदवी प्रमाणपत्र) वकील असल्यास बार कॉन्सील सर्टिफिकेट जोडावे. अनुभवासंदर्भात आवश्यक कागदपत्रे ई., रुपये 100 बॉण्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र नोटरी करुन, अशी कागदपत्रे सादर करावीत. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'