महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : "महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार "साठी, इच्छुक व्यक्ती आणि संस्थानी दि. 27 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक संतोष चिकणे यांनी केले आहे. राज्यातील वीरशैव-लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक समाज प्रबोधनकार व समाज सेवक आणि यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार देण्याचा शासन निर्णयान्वये शासनाने घेतलेला आहे. त्यानुषंगाने इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत "महात्मा बसवेश्वर यांचे जयंती निमित्त एक व्यक्ती एक संस्था यांना "महात्मा बसवेश्वर सामाजिक समता - शिवा पुरस्कार" देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी वीरशैव- लिंगायत समाजाकरिता सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन व आर्थिकदृष्टया कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते आध्यामिक प्रबोधनकार व साहित्यिक तसेच सामाजिक संस्था असाव्यात. वीरशैव लिंगायत समाजासाठी कार्य करणारे समाजकल्याण, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक क्षेत्रात कमीत कमी दहा वर्ष कार्य केलेले असावे. पुरस्कारासाठी पुरूषांचे वय 50 वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त असावे व स्त्रिंयाचे वय 40 वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त असावे. तरी इच्छुक व्यक्ती आणि संस्थानी प्रस्ताव सादर करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण, कार्यालय सिधुदुर्ग, डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी, दूरध्वनी क्र.०२३६२ २८८८८२ या कार्यालयाशी संपर्क साधावा. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'