तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्गनगरी, दि.08 (जि.मा.का): तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यवृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरणाच्या ROS व GOS नुसार धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रामधुन येणारे अतिरिक्त पाणी नियंत्रित पध्दतीने पुच्छ कालव्याव्दारे तिलारी नदीत सोडण्याचे नियोजन आहे. त्याअनुषंगाने दि. 8 जूलै 2022 रोजी खळग्यातील दगड धरणाच्या साडव्यावरुन अतिरीक्त पाणी नियंत्रित पध्दतीने पुच्छ कालव्याव्दारे तिलारी नदीत सोडण्यात येणार असल्याने तसेच क्षेत्र, खरारी नाल्यातील पाणी नदीपात्रात येवून नदीपात्राची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना इशारा देण्यात येत आहे की दि 8 जूलै पासून पुढील कालावधीमध्ये नदीपात्रातील प्रवाह कधीही वाढु शकत असल्याने जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, खानयाळे-आवाडे, मणेरी, कुडासे, साटेली-भेडशी या गावातील नागरिकांना दक्षता घेण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात येत आहे. याबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी – 1) तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, खानयाळे-आवाडे, मणेरी, कुडासे, साटेली-भेडशी गावातील ग्रामस्थांना याबाबतची माहिती होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय तसेच गावातील लोकांच्या निदर्शनास येतील अशा ठिकाणी फलकावर सूचना प्रसिध्द कराव्यात. 2) रात्रीच्या वेळी नागरिकांनी नदीपात्रातून ये-जा करु नयेत. 3) नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, नदीपात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी याबाबत सतर्कता बाळगावी. 4) कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, खानयाळे-आवाडे, मणेरी, कुडासे, साटेली-भेडशी या ग्रामपंचायतींनी धरणातील पाणी सोडण्यासाठी दवंडी पिटवून लोकांना माहिती द्यावी. 5) नदीच्या पाणी पातळीत वाढ होवून पुलांवर पाणी आल्यास अशा पुलांवरुन वाहतूक होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. तसेच अशा पुलाच्या ठिकाणी पोलीस तैनात ठेवावी. 6) तालुक्यातील शोध व बचाव गटातील पोहणारे सदस्य यांच्या संपर्कात रहावे व त्यांना याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'