जिल्हा परिषद व पंचायत समितींसाठी आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर
सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.): महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील कलम 12 उपकलम (1) कलम 58 (1)अ प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम 1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता आरक्षण निश्चित करणेकरिता सोडत काढणे तसेच आरक्षणचे प्रारुप प्रसिध्द करुन त्यावर हरकती व सूचना करण्यासाठी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी पुढीलप्रमाणे कार्यक्रम जाहिर केले आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सभेची तारीख 28 जुलै 2022 रोजी सकाळी 11.30 जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथील जुना नियोजन सभागृह येथे, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक 29 जुलै 2022 आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी दि . 29 जुलै 2022 ते 2 ऑगस्ट 2022 पर्यंत.
पंचायत समिती,वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग या पंचायत समितींसाठी संबंधित तहसिलदार कार्यालयामध्ये दि. 28 जुलै 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता सभा होईल. पंचायत समितींसाठी आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक 29 जुलै 2022 व आरक्षणाबाबत संबंधित तहसिलदार यांचेकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी दि. 29 जुलै 2022 ते 2 ऑगस्ट 2022 पर्यंत असणार आहे. तरी जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे. त्यांनी संबंधित ठिकाणी व वेळी हजर रहावे असे कार्यक्रमाच्या प्रकटनामध्ये म्हटले आहे.
00000
Comments
Post a Comment