जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी
सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.300 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 7.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 5.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.कणकवली-वागदे,राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 35.000 मीटर इतमी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.
00000
राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग (जिमाका) दि. 29 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते. यापूर्वी पिकस्पर्धेची सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पिकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आलेली आहे.त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वसाधारण ...
Comments
Post a Comment