'बळीराजासाठी एक दिवस' उपक्रमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून शाळांचे अभिनंद
सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का): 'बळीराजासाठी एक दिवस' हा उपक्रम सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविण्यात आला असून त्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व शाळांचे अभिनंदन करण्यासाठी अभिनंदन पत्र सादर करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या सर्व शाळांमध्ये दि. 7 व 8 जुलै 2022 रोजी बळीराजासाठी एक दिवस हा उपक्रम नियोनपूर्वक व मोठ्या उत्साहाने राबविण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीबद्दल माहिती मिळाली, विद्यार्थ्यावर श्रमप्रतिष्ठेचे संस्कार करता आले आणि या उपक्रमामध्ये समाज व शाळा यांच्यात सकारात्मक आंतरक्रिय घडून आल्या. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांबद्दल आदर व शेती व्यवसायाबद्दल प्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. जिल्हा परिषदेच्या या विशेष उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जिल्ह्यातील ज्या शाळांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला त्या सर्व शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, त्याचप्रमाणे त्या शाळांना मार्गदर्शन करणारे केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी तसेच जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील अधिकारी यांचे मन:पुर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
तसेच सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व सरपंच, ग्रा.पं.सदस्य, इतर पदाधिाकारी,ग्रामस्थ, शेतकरी बंधुभगिनी यांचेही मन:पुर्वक अभिनंदन व आभार !
यापुढे सुध्दा शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा परिषदेकडून जे-जे उपक्रम राबविले जातील त्यात आपण असाच सक्रीय व यशस्वी सहभाग नोंदवाल याची खात्री आहे.
शुभेच्छासह...
Comments
Post a Comment