सखी वन स्टॉप सेंटरने दिला पीडित महिलेला आधार

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.) : भरोसा सेल (पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्गनगरी) यांनी दिनांक 11 जुलै 2022 रोजी एका पिडित महिलेस निवाऱ्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर येथे दाखल केले. या महिलेस दाखल करताना महिला अत्याचार निवारण कक्ष सिंधुदुर्गच्या एस.जी. पाडावे, समुपदेशक नमिता परब सावंतवाडी समुपदेशन केंद्र, धोंडी काशिराम जाधव पोलीस पाटील - तळवडे, उपस्थित होते. या महिलेस मानसिक आधार व समुपदेशनाची तसेच निवाऱ्याची गरज असलेने तिला सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदूर्ग येथे दिनांक 15 जुलै 2022 रोजी पर्यंत, अशी ५ दिवस निवाऱ्याची सोय तसेच समुपदेशन सेवा पुरविण्यात आली. पुढील निवाऱ्यासाठी तिला अंकुर महिला वसतीगृह सावंतवाडी येथे दाखल करणेत आले. यावेळी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक ॲड. पूजा काजरेकर, सल्लागार ॲड.रुपाली प्रभू, केस वर्कर चैत्राली राऊळ, ॲड. मीनाक्षी नाईक, पॅरामेडिकल स्टाफ नर्स योगिता परब, स्नेहा मोरे, पॅरालिगल लॉयर ॲड. सुवर्णा हरमलकर, मेड सरिता कुंभार, सूरक्षारक्षक अभिषेक मयेकर, विजय पांग्रडकर, देवेंद्र नाईक, IT स्टाफ आर.बी साईल उपस्थित होते. या कामी जिल्हा महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, संरक्षण अधिकारी श्रीनिधी देशपांडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'