जिल्हा परिषदेच्या 10 टक्के सेस अनुदानातील महिला व बालविकास विभागाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) : जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नाच्या 10 टक्के सेस अनुदानातून महिला व बालविकास विभागामार्फत मुलींना व महिलांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. जिल्ह्यातील मुली व महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
10 टक्के सेस अनुदानातून मुलींना व महिलांना व्यवसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे, मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारिरीक हितासाठी प्रशिक्षण देणे, इयत्ता 7 वी ते इ. 12 वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण देणे, महिलांना साहित्या पुरवणे, शाळेत जाणाऱ्या मुलींना दोन चाकी सायकल पुरविणे या योजना राबवण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्याती अर्ज गावातील अंगणवाडी केंद्र किंवा तालुक्यातील बाल विकास प्रकल्प कार्यालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय यांच्याशी संपर्क साधुन परिपूर्ण प्रस्ताव तयार करावेत असे आवाहनी महिला व बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment