मतदार यादीतील तपशीलाशी आधार क्रमांक सलग्न करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.)- जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपल्या मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक सलग्न करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, निवडणूक आयोगाकडील पत्रान्वये केंद्र शासन विधी व न्याय मंत्रालयाने निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मध्ये सुधारणा केल्याचे कळवले आहे. यामधील कलम 23 नुसार मतदार यादीतील तपशीलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून एच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. यासाठी मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 26 ब नुसार फॉर्म नं 6 ब तयार करण्यात आला आहे. सदर सुधारणांची अंमलबजावणी दि. 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार आहे. मतदारांना आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र.6 बभारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तसेच मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधारक्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब ERO Net, GARUDA, NVSP, VHA या म्ध्यमांवर उपलब्ध असेल. या अर्जाच्या छापील प्रतीही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने आधारक्रमांक भरण्यासाठीची सुविधा पोर्टल,ॲपच्या माध्यमातून स्व-प्रमाणीकरण व स्व प्रमाणीकरणाशिवाय उपलब्ध आहे. स्व-प्रमाणीकरण - आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल, ॲपच्या माध्यमातून मतदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज क्र. 6 ब भरून आधार क्रमांक नोंदवू शकतो आणि UIDAI कडे नमुद असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त OPT द्वारे आधारचे प्रमाणीकरण करु शकतो. तथापि, तपशिलात फरक असल्यास प्रमाणीकरण अपयशी ठरण्याची शक्यता आहे. स्व-प्रमाणीकरणाशिवाय - जर मतदारास स्व प्रमाणीकरण करावयाचे नसल्यास किंवा वरील प्रमाणे प्रमाणीकरण अपयशी ठरत असल्यास, मतदार त्याचा स्व-प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाईन पद्धतीने अर्ज क्र. 6 ब भरून त्यासोबत योग्य दस्ताऐवज सादर करू शकतो. घरोघरी भेट देऊन मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र. 6 ब द्वारे स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष शिबिरासोबत मतदारांना छापील नमुना अर्ज क्र. 6 ब मध्ये पुरविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याद्वारे प्राधिकृत केलेल्या मतदार सुविधा केंद्र, ई-सेवा केंद्रे आणि नागरिक सेवा केंद्राद्वारे देखील हा तपशील मतदार नोंदणी अधिकारी गोळा करतील. मतदार यादीतील कोणत्याही विद्यमान मतदाराच्या आधार क्रमांक सदार करण्यास, आधार क्रमांक देण्यास असमर्थतेच्या आधारावर मतदार नोंदणी अधिकारी यांना मतदार यादीतील कोणतीही नोंद वगळण्यात येणार नाही. विविध माध्यमांद्वारे ERONET मध्ये डिजिटल केलेला 12 अंकी आधारक्रमांक कोणत्याही परिस्थितीत ERONET मध्ये संग्रहित केला जाणार नाही. मतदारांनी आधार जमा करणे हे ऐच्छिक आहे आणि केवळ आधार क्रमांक सादर करण्यास असमर्थतेमुळे त्यांची नावे मतदार यादीतून काढून टाकली जाणार नाहीत, असेही त्यात म्हटले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'