सिंधुदुर्गनगरीत 22 रोजी पेन्शन अदालत
सिंधुदुर्गनगरी,दि.15 (जि.मा.का.) सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनसंबंधी तक्रारींचे प्रामाणिकपणे निवारण करण्यासाठी अधीक्षक डाकघर सिंधुदुनगरी येथे शुक्रवार दि.22 जुलै 2022 रोजी दुपारी 3. वाजता पोस्टल पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक जनार्दना रेड्डी यांनी दिली आहे.
या मध्ये निवृत्ती वेतधारकांचा संबंधित तक्रारी, टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत. सेवेत असताना मृत्य झालेला आहे. 3 महिन्यांच्या आत निपटारा झालेले नाही.अशा प्रकरणाचा डाक पेन्शन अदालत मध्ये विचार केला जाईल. या पेन्शन अदालतमध्ये नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकारी इत्यादी आणि निती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्तीवेतनधारकानी आपले अर्ज जी. जनार्दना रेड्डी,अधीक्षक डाकघर सिंधुदुर्गनगरी या पत्यावर दिनांक 20 जुलै 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पाठवू शकतात. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर पेन्शन अदालत मध्ये विचार करण्यात येणार नाही.
00000
Comments
Post a Comment