सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला नगरपरिषदेचा प्रभाग मुसदा प्रसिध्द

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.): राज्य निवडणूक आयोग यांचेकडील दिनांक 22 जुलै 2022 रोजीचे पत्र, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरिक अधिनियम 1965 मधील कलम 10 नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद सावंतवाडी मालवण व वेंगुर्ला क्षेत्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती त्याचप्रमाणे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रिंयासाठी राखून ठेवावयाचे प्रभाग धरुन) व उर्वरित स्त्रिंयासाठी जे प्रभाग राखून ठेवण्यात आलेले आहेत ते प्रभाग दर्शविणारा आदेशाचा मसुद्दा ची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर आज दिनांक 29 जुलै 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच या तिन्ही नगरपरिषद यांचे कार्यालयामध्ये नगरपरिषद क्षेत्रातील लोकांच्या माहितीसाठी कार्यालयीन वेळेत खुली ठेवण्यात आलेली आहे. या आदेशाच्या मसुद्यात कोणाची हरकत व सूचना असल्यास त्या संबंधितांचे सकारण लेखा निवेदन संबंधित नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे नावे नगरपरिषद कार्यालय येथे सोमवार दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यत पोहचेल असे पाठवावे. सदर तारखेनंतर संबंधित ठिकाणी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'