समुपदेशनानंतर सखी वन स्टॉप केंद्राकडून अल्पवयीन पीडितेची अंकुर महिला वसतीगृहात रवानगी

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.)- कणकवली पोलीस ठाणे यांनी मु.पो.नरडवे, ता.कणकवली येथील अल्पवयीन पीडित मुलीला तात्पुरत्या निवाऱ्यासाठी व समुपदेशन होण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग येथे दाखल केले. पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याने तिला बालकल्याण समिती, सिंधुदुर्ग यांचेसमोर हजर करण्यात आले व तिच्या पुढील निवासाच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने तिला अंकुर महिला वसतिगृह सावंतवाडी येथे दाखल करण्यात आले. तरी यावेळी पोलीस उपनिरीक्षक डी.एस.पाटील, कणकवली पोलीस ठाणे, वन स्टॉप सेंटर च्या केंद्र प्रशासक ॲड.पूजा काजरेकर, सल्लागार ॲड.रुपाली प्रभू, केस वर्कर चैत्राली राऊळ, ॲड. मीनाक्षी नाईक, पॅरामेडिकल स्टाफ नर्स योगिता परब, स्नेहा मोरे, पॅरालिगल लॉयर ॲड. सुवर्णा हरमलकर, मेड सरिता कुंभार, सूरक्षारक्षक अभिषेक मयेकर, विजय पांग्रडकर, देवेंद्र नाईक, IT स्टाफ आर.बी साईल, आदी उपस्थित होते. यासाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, विधी सल्लागार श्रीनिधी देशपांडे, बालकल्याण समिती अध्यक्ष ॲड.संदेश तायशेटे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'