ग्रामीण भागातील गरजू लाभार्थीसाठी महात्मा फुले महामंडळाचा सुधारित चुली कार्यक्रम
सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाअंतर्गत सन 2021 पासून महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्या. (महाप्रित) कंपनी स्थापन करण्यात आली आहे. मे.एनकिंग कंपनी व महाप्रित कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सुधारित चुली गरजू लाभार्थी कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक के.व्ही. लोहकरे यांनी दिली.
जिल्ह्यातील रहिवाश्यांकरिता पर्यावरणीय अनुकूल सुधारित निर्धूर चुल मोफत वाटपासाठी निकषयोग्य रहिवाश्यांकडून अर्ज आमंत्रित करीत आहे.रहिवाश्यांसाठी पात्रता व निकष – अनुसूचित जातीचा असावा. गरिबी रेषेखाली असावा. LPG गॅस कनेक्शन नसावे. जिल्हयातील इच्छुक रहिवाश्यांनी दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत RM/DM-MPBCDC शी संवाद साधावा. सर्व तपशिल https://mahapreit.in व https://mpbcdc.maharashtra.gov.in वर पाहता येईल. असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
Comments
Post a Comment