शिष्यवृत्ती परीक्षा 31 जूलै रोजी
सिंधुदुर्गनगरी, दि.14 (जि.मा.का.): पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) परीक्षा बुधवार दि. 20 जूलै 2022 रोजी जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते. सद्यास्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश्यस्थिती व बहूतांश ठिकाणी भूस्खलनामूळे वाहतून बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित व त्याची सुरक्षा लाक्षात घेता सदर परीक्षा रविवार दि.31 जूलै 2022 रोजी घेण्यात येईल. यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. 31 जूलै 2022 च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येतील. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी, महेश धोत्रे यांनी दिली आहे.
0000
Comments
Post a Comment