नोंदणीकृत सार्वजनिक न्यासांना वार्षिक लेखा परिक्षण तात्काळ करून धर्मादाय आयुक्त कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने दाखल करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी,दि.15 (जि.मा.का.) राज्यातील नोंदणीकृत सर्व सार्वजनिक न्यासांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 33 अन्वये त्यांच्या वार्षिक हिशेबपत्रकाचे, हिशेबपत्रकांचे लेखा परिक्षण करणे अनिवार्य आहे. अशा सार्वजनिक न्यासांपैकी ज्या न्यासांनी अद्यापपर्यंत मागील प्रलंबित व दिनांक 31 मार्च 2021 रोजी पर्यंतच्या त्यांच्या अद्ययावत वार्षिक हिशेबपत्रकाचे/हिशेबपत्रकांचे लेखापरिक्षण केलेले नाही, त्यांनी ते तात्काळ करून घ्यावे व संबंधित धर्मादाय आयुक्त कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने दाखल करावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र के. महाजन यांनी केले आहे.
ज्या न्यासांनी लेखापरिक्षण केलेले आहेत, परंतु सन 2016 पर्यंत प्रत्यक्षरित्या व सन 2016 नंतर ऑनलाईन संबंधित धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल केलेल नाहीत त्यांनी ऑनलाईन पध्दतीने दाखल करावीत. जर त्यांना ऑनलाईन पध्दतीने दाखल करण्यास अडचण येत असेल, तर त्यांनी संबंधित धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून दि. 25 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने दाखल करावीत. सार्वजनिक न्यासांशी संबंधित सर्व सनदी लेखापाल, विधिज्ञ तसेच अधिकृत लेखापरिक्षक यांनी देखील संबंधित न्यासांना वरीलप्रमाणे नमुद केल्यानुसार अनुषंगिक निर्देश द्यावेत व सदर न्यासांचे अद्ययावत वार्षिक लेखापरिक्षत हिशेबपत्रके कोणत्याही परिस्थितीत दिनांक 25जुलै 2022 संबंधित धर्मादाय आयुक्त कार्यालयात ऑनलाईन दाखल करावीत. सूचनेनुसार हिशेबपत्रके दाखल न केल्यास, नियमानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. याबाबत नोंद द्यावी, असे राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र के. महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या दि. 11 जुलै 2022 रोजीच्या आदेशान्वये धर्मादाय आयुक्त कार्यालयास दि. 01 एप्रिल 2010 ते दि. 31 मार्च 2021 या कालावधीतील नोंदणीकृत न्यासांकडून वार्षिक 3 टक्के दराने (Gross annual income of gross annual collection or receipt) महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 चे कलम 58 नुसार जमा होणाऱ्या रक्कमेचा तपशील उच्च न्यायालय, मुंबई येथे सादर करावयाचा आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून माहिती मागविली जात आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 च्या कलम 32, 33 व 34 अन्वये नोंदणीकृत न्यासांनी, त्यांच्या वार्षिक हिशेबपत्रकाचे/हिशेबपत्रकांचे अद्यापपावेतो लेखापरिक्षण करून घेऊन, संबंधित धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल करून घेणे आवश्यक आहे. परंतु नोंदणीकृत न्यासापैकी बहुतांश न्यासांनी अद्यापपर्यंत हिशेबपत्रके दाखल केलेली नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब असून, तो महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 चे कलम 66 व 67 अन्वये दंडनीय असल्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र के. महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
00000
Comments
Post a Comment