पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा विभागाचे लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.): स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तयार करण्यात आलेल्या ई-ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा विभागाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते रविवार दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता लोकार्पण होणार आहे. हा सोहळा कुडाळ येथील रा.ब. अनंत शिवाजी देसाई (टोपीवाले) वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालय पानबाजार येथे होणार आहे. तरी नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'