काथ्या धोरणांवर सविस्तर चर्चा
सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): महाराष्ट्र लघुऊद्योग विकास महामंडळाच्या महकॉयर कुडाळ येथील कार्यालयात महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालिका तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी फरोग मुकादम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत काथ्या उत्पादन वाढीसाठी आणि काथ्या उत्पादनाना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तयार होत असलेल्या 'काथ्या धोरणांवर' सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थितांकडून काथ्या धोरणासाठी सूचना मागविल्या असता संबंधित उपस्थितांकडून 'केवळ नारळाच्या सोडणांवर नाही तर नारळाचे झाड हे उत्पादन मानून पूर्णपणे त्यावर प्रक्रिया करून उत्पादांनांवर भर देण्यासंबंधी' चर्चा करण्यात आली. त्यावर सह व्यवस्थापकीय संचालिका यांनी सध्या सिंधुदुर्गात महामंडळाकडून सुरु असलेल्या तुळस, हडी, परुळे, सांगेली येथील काथ्या उत्पादन केंद्रांवर असलेल्या जुन्या यंत्र सामग्री बदलून अद्ययावत मशीनरी बसविण्या संबंधी प्रस्तावित असून त्याबाबत प्रक्रिया सुरु आहे. त्याचबरोबर जिल्हातील कथ्यावर आधारीत उद्योगाना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महामंडळाकडून विक्री सहाय्यकांची नेमाणूक करावी अधिक बाजारपेठ तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
त्याचप्रमाणे कच्च्या माला वर सबसिडी देण्यासंदर्भात निर्णय विचाराधीन असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. काथ्या धोरण आणि काथ्या उद्योगाच्या विकासासाठी सरकार आणि महामंडळा बरोबरच युवक आणि युवतींनी या उद्योगात पुढे येण्याची गरज असल्याचे सह व्यवस्थापकीय संचालिका श्री. मुकादम यांनी अधोरेखित केले. त्यासाठी लागणारे प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान विकासासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यातून प्रायोगिक तत्वावर 500 महिला आणि पुरुषांना केरळ येथे नेऊन अध्ययावत प्रशिक्षण देखील महामंडळाकडून देण्याची तयारी सह व्यवस्थापकीय संचालिका यांनी दर्शविली.
या बैठकीसाठी कॉयर बोर्ड चे प्रादेशिक अधिकारी श्रीनिवासन आणि भोई, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक प्रशांत पाटील, त्याचबरोबर प्रकाश तोंडवळकर सरपंच हडी, महेश मांजरेकर, माजी सरपंच हडी, प्रदीप प्रभू माजी सरपंच परुळेबाजार, संजय दुधवडकर उपसरपंच परुळेबाजार, हर्षवर्धन बोरावडेकर उद्योजक, काशिनाथ गायकवाड प्रभारी अधिकारी काथ्या उद्योग सिंधुदुर्ग, शंकर सावंत, प्रकल्प अधिकारी काथ्या उद्योग, जितेंद्र वजराटकर प्रकल्प अधिकारी काथ्या उद्योग निखिल चौधरी काथ्या धोरण समन्वयक आदी उपस्थित होते.
या बैठकी आधी तहसीलदार कार्यालय दोडामार्ग येथे तहसीलदार कार्यालयात तहसीलदार संकेत यमगर आणि सह व्यवस्थापकीय संचालिका फरोग मुकादम यांच्या उपस्थितीत काथ्या उत्पादन केंद्र साठेली- भेडशी आणि झोळंबे ता. दोडामार्ग ही दोन्ही केंद्रे सुरु करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. या केंद्रावरील अडचणी समजून घेण्यासाठी व त्यावर उपाय योजना सुचविण्यासाठी संबंधित दोन्ही ग्रामपंचायती मधील विशाखा नाईक सरपंच झोळंबे, राकेश गवस माजी सरपंच झोळंबे, सामाजिक कार्यकर्ते गणेश प्रसाद गवस आणि महावितरण चे उपकार्यकारी अभियंता नलावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
००००००
Comments
Post a Comment