गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतूक नियोजनाची अंमलबजावणी कर

ा सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.):गणेशोत्सव शांततेत, सुरळीत व भक्तीमय वातावरणात पार पाडण्यासाठी वाहतूक नियोजनाबाबत निर्गमित केलेल्या आदेशाचे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे. दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजीपासून राज्यात गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवाकरीता मुंबई, पुणे तसेच इतर जिल्ह्यातून व राज्यांमधून चाकरमानी कुटुंबासह आपल्या मुळ गावी सिंधुदुर्गात रेल्वे, बसेस व खाजगी वाहनाने मोठ्या संख्येने येतात. त्यावेळी ये-जा करणाऱ्या चाकरमानी, प्रवाशांना प्रवासात कुठेही गैरसोय होवू नये, वाहतूक कोंडी होवु नये, प्रवास सुरळीत व सुरक्षित व्हावा यासाठी दरवर्षी शासन व जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य मार्गावर आवश्यकतेनुसार फिक्स पॉईट, पेट्रोलिंग नेमून वाहतूकीचे नियोजन करण्यात येते. सन 2023 चा गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पडावा, प्रवाशांना , चाकरमान्यांना वाहतूकीचा कोणताही त्रास होवू नये, प्रवास वेळेत व सुरक्षित व्हावा याकरीता महाराष्ट्र शासनाकडून कोकणवासीयांच्या सोयीसाठी पनवेल ते इन्सुली (सिंधुदुर्ग) राष्ट्रीय महामार्ग क्र.66 (रा.म.क्र.जुना क्र. 17) वरुन होणऱ्या अवजड वाहतूकीचे निर्बंधाबाबत पुढीलप्रमाणे आदेश निर्गमीत करण्यात आलेले आहेत. 1. गणेशोत्सवाच्या पूर्ण तयारीचा प्रवास , मुर्तीचे आगमन दि.16 सप्टेंबर 2023 रोजी 00:01 वाजता पासून ते दि.20 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 23:00 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सर्व वाहने ज्यांची वहन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे (जङ-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) त्यांना वाहतूकीस पूर्णतः बंद करण्यात यावी. 2. 05 व 07 दिवसांच्या गणपतीचे विसंजन, गौरी गणपती विसर्जन, काही अंशी परतीचा प्रवास- दि.23 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 08:00 वाजता पासून ते दि. 25 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 23:00 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सर्व वाहने ज्यांची वहन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे (जङ-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) अशा सर्व वाहनांची वाहतूक पुर्णतः बंद करण्यात यावी. 3. अनंत चतुदर्शी 10 दिवसांचे गणपती विसर्जन, परतीचा प्रवास दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता पासून ते दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 20:00 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) वाहतूकीस पूर्णत: बंद करण्यात यावी. 4. दि. 16 सप्टेंबर 2023 रोजी 00:01 वाजता पासून ते दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 20:00 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर संपूर्ण प्रवास बंदी असलेल्या कालावधी व्यतिरीक्त उर्वरीत कालावधीत अशी वाहने, ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, टॅक्स, लॉरी) अशा वाहनांना दि.20 सप्टेंबर 2023 रोजी रात्रौ 23:00 वाजता पासून ते दि. 23 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत या वेळेत वाहतूकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहने दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 20:00 वाजेनंतर नियमित प्रवास करतील. परंतु वरील निबंधबंदी दूध, पेट्रोल , डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तु वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या रस्ता रुंदीकरण / रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहीत्य, माल इ. ने- आण करणान्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग / महामार्ग पोलीस यांनी प्रवेशपत्र देणे आवश्यक आहे. गणेशोत्सव काळात वाहतूक नियोजनाकरीता महाराष्ट्र शासनाने वरीलप्रमाणे आदेश निर्गमित केलेले असून मुंबई, गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरुन दि. 16 सप्टेंबर 2023 ते दि.29 सप्टेंबर 2023 रोजीचे मुदतीत प्रवास करणाऱ्या सर्व वाहनधारक, वाहन चालकांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. जड-अवजड वाहनांना बंदी घातलेल्या दिनांक व कालावधीत त्यांनी महामार्गावरून प्रवास, वाहतूक करु नये. वाहनधारक / वाहनचालक यांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करुन गणेशोत्सव काळात वाहतूक नियोजनाकरीता सहकार्य करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून करण्यात येत आहे. तसेच गणेशात्सव काळात प्रवाशांना वाहतूकीबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास मदतीसाठी पोलीस नियंत्रण कक्ष, सिधुदुर्ग (02362-228200, मोबा.नं. 8275776213) किंवा जिल्हा वाहतूक शाखा, सिंधुदुर्ग (मोबा.नं. 9823272037) या नंबरवर संपर्क साधावा. असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'