जिल्हास्तरीय टेनिक्वाईट क्रीडास्पर्धेत रामगडचे प्रगत विद्यामंदिर प्रथम

सिंधुदुर्गनगरी, दि.5 (जि.मा.का.) : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयाव्दारे जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुलांमध्ये प्रगत विद्यामंदिर रामगड प्रथम क्रमांक पटकविला असल्याचे माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शालेय समिती चेअरमन तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे वेंगुर्ला,. दिनेश सावंत, सुजाता कृष्णा बाईत संघटना प्रतिनिधी टेनिक्वाईट, असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग, हनुमंत तांबट संघटना प्रतिनिधी टेनिक्वाईट, असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग हे उपस्थित होते. स्पर्धेमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली़, माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी, प्रगत विद्यामंदिर रामगड, कणकवली कॉलेज कणकवली, श्री कलेश्वर विद्यामंदिर,नेरूर या शाळांमधुन एकुण 18 संघ उपस्थित होते. तसेच स्पर्धा पार पाडण्यासाठी पंच व तांत्रिक अधिकारी दिनेश सावंत, शिवदासकुमार मसगे, कमलेश विनायक गोसावी, सुजाता कृष्णा बाईत, हनुमंत तांबट या पंचाच्या सहकार्याने स्पर्धा पार पाडण्यात आल्या. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारा जिल्हास्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धा दिनांक 2/09/2023 रोजी सकाळी 09.00 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे यशस्वीरित्या पार पाडल्या. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे 14 वर्षाखालील मुले , प्रथम- प्रगत विद्यामंदिर रामगड , द्वितीय- पोदार इंटरनॅशनल स्कूल, तृतीय- माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी. 14 वर्षाखालील मुली, प्रथम- प्रगत विद्यामंदिर रामगड, द्वितीय- माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी, तृतीय- श्री कलेश्वर विद्यामंदिर,नेरूर. 17 वर्षाखालील मुले, प्रथम- माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी, द्वितीय- प्रगत विद्यामंदिर रामगड, तृतीय- श्री कलेश्वर विद्यामंदिर,नेरूर. 17 वर्षाखालील मुली, प्रथम- प्रगत विद्यामंदिर रामगड, द्वितीय- श्री कलेश्वर विद्यामंदिर,नेरूर. 19 वर्षाखालील मुले, प्रथम- प्रगत विद्यामंदिर रामगड, द्वितीय- कणकवली कॉलेज कणकवली, तृतीय- श्री कलेश्वर विद्यामंदिर,नेरूर. 19 वर्षाखालील मुली, प्रथम- प्रगत विद्यामंदिर रामगड, द्वितीय- कणकवली कॉलेज कणकवली, तृतीय- श्री कलेश्वर विद्यामंदिर,नेरूर . ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'