'स्वच्छता ही सेवा' उपक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): "स्वच्छता ही सेवा" या उपक्रमाअंतर्गत 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 10 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकिय कार्यालय व परिसर स्वच्छ करण्यात येणार असल्याची माहिती पाणी स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी दिली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात दि.15 सप्टेंबर ते दिनांक 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता ही सेवा 2023 उपक्रम राबविण्यात येत आहेत. "स्वच्छता ही सेवा २०२३" ची संकल्पना "कचरा मुक्त भारत" ही आहे. यामध्ये दृष्यमान स्वच्छता व सफाई मित्र कल्याण यावरती लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यावर्षी स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून यामध्ये स्वयंस्फुर्तीने श्रमदान करणे गरजेचे आहे. या अभियानात ग्रामीण भागातील बसस्थानके, पर्यटन स्थळे, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले आदी ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. तसेच सिंगल युज प्लास्टीक (SUP) वापर व दुष्परिणाम याबाबत गावांमध्ये जनजागृती करणे, शालेय स्तरावर स्वच्छता मोहिम यांचे आयोजन करणे, ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण, कचऱ्यातुन उत्पन्न घेणे, बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी भिंती चित्रे काढणे व कचरा वर्गीकरण पेटया ठेवणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. स्वच्छतेसाठी युवकांच्या कृतीला चालना देण्यासाठी युवकाच्या नेतृत्वाखाली सर्व गटाना एकत्रित करून स्वच्छतेचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दिनांक 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शासकिय कार्यालयात स्वच्छता हि सेवा अंतर्गत सर्व शासकिय कार्यालये व कार्यालय परिसर स्वच्छ करण्याबाबत जिल्हाधिकारी किशोर तावडे व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यालयाना सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री. ठाकुर यांनी दिली आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री साधणार संवाद 'स्वच्छता ही सेवा' पंधरवडा कालावधीमध्ये सुरु असणाऱ्या दैंनदिन उपक्रमाना गती देण्याकरीता पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि.26 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते 12.30 वाजता स्वच्छता संवाद कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात 100 टक्के हागणदारी मुक्त अधिक (ODF+) झालेला जिल्हा म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याशी मंत्री महोदय ऑनलाईन संवाद साधणार आहेत. तसेच सर्व सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करणार आहेत. "सफाई मित्र सुरक्षा दिवसांचे "आयोजन स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम दि. 15 सप्टेंबर से दि. 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा योग्य सन्मान करण्यासाठी, स्वच्छता कर्मचाऱ्याचा बाबतीत सामाजिक दृष्टीकोन बदलण्यासाठी आणि त्याचा कामापासुन अनेकांनी स्वच्छतेची प्रेरणा घेण्यासाठी दि.25 सप्टेंबर 2023 रोजी स्वच्छता ही सेवा अंतर्गत "सफाई मित्र सुरक्षा दिवसांचे आयोजन करण्यात येणार आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'