जिल्ह्यात 'सखी निवास'साठी इच्छुक संस्था आणि एजन्सीनी 20 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत
सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.): जिल्ह्यासाठी एक 'सखी निवास' कार्यान्वित करायचे असून जिल्ह्यातील नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या शहरांमध्ये सुरक्षित व सोयीस्कर निवासाची व्यवस्था होण्यासाठी भाडे तत्त्वावरील इमारतीमध्ये 'सखी निवास' कार्यान्वित करण्यासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार विहित पद्धतीने प्रस्ताव मागविले आहेत. जिल्ह्यात योजनेंतर्गत सखी निवास योजना राबविण्यास इच्छुक संस्था, एजन्सी यांनी दि. 20 सप्टेंबर 2023 रोजी साय. 5 वाजेपर्यंत विहित वेळेत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित व सोयीच्या पद्धतीने निवासाच्या व्यवस्थेकरिता मिशन शक्ती अंतर्गत सखी निवास या योजनेचा समावेश आहे. राज्यात सद्यस्थितीत कार्यरत असणाया नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहांव्यतिरिक्त आणखी नवीन 50 सखी निवास भाडे तत्वावरील इमारती मध्ये प्रशासकीय खर्च, इमारत भाडे, पाळणा व्यवस्थापन याकरिता अनुदानासह कार्यान्वित करावयाची आहेत. महिला व बालविकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्याकडून दि.3 जून 2023 रोजी सर्व जिल्ह्यांतील आघाडीच्या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असलेली सविस्तर माहिती, योजनेचे निकष, शासन निर्णय, अर्जाचा नमुना अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे, इमारतीचे निकष इ. सर्व माहिती महिला बालविकास आयुक्तालयाच्या https://www.wcdcommpune.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
या निकषानुसार केंद्र शासन पुरस्कृत सधी निवास योजना कार्यान्वित करून याविषयी राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे शासननिर्णय व सूचना यानुसार योजना राबविण्यास इच्छुक असलेल्या संस्था व एजन्सी यांजकडून दि.30 जून2023 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत सादर करण्याबाबत कळविणेत आले होते. परंतु आयुक्त, महिला व बाल विकास विभाग यांच्याकडील पत्रानुसार पुनश्चः प्रस्ताव मागविण्यासाठी स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देणेबाबत कळविण्यात आले आहे. तरी इच्छुक असलेल्या संस्था / एजन्सी यांच्याकडून दि. 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जिल्हा महिला व वालविकास अधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत. ए-ब्लॉक, तळमजला, ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे एकूण 5 प्रतींमध्ये पृष्ठ क्रमांक नमूद करून प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. तसेच प्रस्ताव हे विहित नमुन्यात व त्यातील सर्व रकान्यामधील माहिती भरून तसेच आवश्यक ते कागदपत्रे/प्रमाणपत्रे सोबत जोडूनच सादर करण्यात यावेत. प्रस्ताव सादर करताना इमारत मालकासोबत केलेला करारनामा नोटरी स्वरुपात असला तरी चालेल परंतु संस्थेस योजना राबविण्यास मान्यता मिळाल्यास मान्यता मिळाल्याच्या दिवसापासून 30 दिवसाच्या आत नोंदणीकृत भाडे करारनामा सादर करणे आवश्यक राहील. प्रस्ताव दि. 20 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंतच स्वीकारले जातील. त्यानंतर मुदती नंतर आलेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष अथवा कार्यालयाच्या 02362-228869 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
०००००
Comments
Post a Comment