जिल्हास्तरीय ऑनलाईन भाषण स्पर्धेसाठी नोंदणी करा
सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.) : नेहरु युवा केंद्र अंतर्गत 2 ऑक्टोंबर 2023 रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाइन भाषण स्पर्धा आयोजित केले आहेत. स्पर्धेच्या नोंदणीसाठी जिल्ह्यातील रहिवासीनी 14 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजेपूर्वी पुढील दिलेल्या लिंकवर https://docs.google.com/forms/d/137wDjan8gDjhKgOkvpCeWK- ph9g0A5FxTylvyz9Dc/edit ऑनलाईन फॉर्म भरावा, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी यांनी केले आहे.
नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग ( भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा संचालय ) अंतर्गत 02 ऑक्टोबर 2023) रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथे Parliamentary Research and Training Institute for Democracies (PRIDE) निमित्त देशाच्या संसदेत श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी 25 स्पर्धक निवडले जातील. या निमित जिल्हास्तरीय ऑनलाइन भाषण स्पर्धा आयोजित केले आहेत. स्पर्धेचा विषय Gandhi's Global Impact Relevance of Gandhian Thought in Today's World (गांधीजी का वैश्विक प्रभाव: आज की दुनिया में गांधीवादी विचार की प्रासंगिकता) हा आहे. भाषा ही इंग्रजी / हिंदी असावी व वेळ जास्तीत जास्त ३ मिनिटे असेल, स्पर्धकांची वयोमर्यादा 18 ते 29 वर्ष (01 ऑक्टोबर 2023) पर्यंत असावे.
कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे : जिल्हास्तरीय स्पर्धा - 15 सप्टेंबर 2023 ऑनलाइन पद्धतीने, राज्यस्तरीय स्पर्धा -19 सप्टेंबरच्या दरम्यान ऑनलाइन पद्धतीने, राष्ट्रीय स्थरावर -2 ऑक्टोबर 2023 दिल्ली येथे संसदेत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक स्पर्धक हा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे व राज्यस्तरीय प्रथम क्रमांक स्पर्धकास राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांसाठी संसदेत आमंत्रित केले जाईल. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ९१७६०९३४२९ /०२३६२-२२५०१२ ई-मेल qyksindhudurg@gmail.com या वर संपर्क करावा. जिल्हास्तरीय स्पर्धेची तारीख व वेळ आणि स्पर्धेची ऑनलाईन लिंक योग्य वेळेत स्पर्धकांना पाठवली जाईल.
०००००
Comments
Post a Comment