जिल्हास्तरीय शालेय बुध्दिबळ क्रीडा स्पर्धेत मुलांमध्ये वैभव राऊळ मुलींमध्ये तनिष्का आडेलकर प्रथम क्रमांकावर
सिंधुदुर्गनगरी, दि.5 (जि.मा.का.) : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत कनेडी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय बुध्दिबळ क्रीडा स्पर्धेत 14वर्षाखालील मुलांमध्ये वैभव राऊळ तर मुलींमध्ये तनिष्का आडेलकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शालेय समिती चेअरमन आर.एच.सावंत, यांनी केले. यावेळी सदस्य तुषार सावंत व पदाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कनिष्ठ लिपीक पंढरीनाथ चव्हाण, प्रशालेचे मुख्याध्यापक सुमंत दळवी, बयाजी बुराण, कणकवली तालुका क्रीडा समन्वयक पी.एन. मसुरकर हे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये तालुकास्तरावरुन निवड झालेल्या खेळाडुंमधुन एकुण 204 खेळाडु उपस्थित होते.
तसेच या स्पर्धा पार पाडण्यासाठी पंच व तांत्रिक अधिकारी श्रीकृष्ण आडेलकर, देवेंद्र सावंत,अजित देठे, पेडणेकर, अच्युतराव वनवे, सचिन हरमलकर, रामचंद्र घावरे, कमलेश गोसावी या पंचाच्या सहकार्याने पार पाडण्यात आल्या. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारा जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा दिनांक 31/08/2023 रोजी सकाळी 09.00 वाजता माध्यमिक विदयामंदिर कनेडी येथे यशस्वीरित्या पार पाडल्या.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –
14 वर्षाखालील मुले , प्रथम- वैभव राउळ , द्वितीय- सुश्रुत नानल, तृतीय- दिवेश बाणे, चतुर्थ- ओम निकम, पंचम- पार्थ वझे. 14 वर्षाखालील मुली , प्रथम- तनिष्का आडेलकर, द्वितीय- मुग्धा साहिल, तृतीय- सेजल हुबे, चतुर्थ- साक्षी रामदुरकर, पंचम- संस्कृती तुलसुलकर. 17 वर्षाखालील मुले, प्रथम- प्रथमेश रामाने, द्वितीय- भावेश कुडतरकर, तृतीय- वेदांत देसाई, चतुर्थ- कणाद कुलकर्णी, पंचम- वरद वाळके. 17 वर्षाखालील मुली, प्रथम- गायत्री राठोड, द्वितीय- मृदुला खाडये, तृतीय- श्रेया शेळके, चतुर्थ- साक्षी गावकर, पंचम- रिया आचरेकर.19 वर्षाखालील मुले, प्रथम- आयुष राठोड, द्वितीय- वरुण देवधर, तृतीय- स्मित गोम, चतुर्थ- राजेश वेदुरकर, पंचम- ऋषिकेश बांधकर. 19 वर्षाखालील मुली प्रथम- अपुर्वा मालवणकर, द्वितीय- सृष्टी गोसावी, तृतीय- सानिका चव्हाण, चतुर्थ- वैष्णवी तवटे,पंचम- सिद्धि आचरेकर.
०००००
Comments
Post a Comment