महास्वयंम पोर्टलवर येणाऱ्या अडचणी, तक्रारींची निराकरण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 18001208040 चा लाभ घ्या

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.) : कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविण्याता विभागामार्फत महास्वयंम पोर्टलवर येणाऱ्या अडचणी, तक्रारींची निराकरण करण्यासाठी लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक 18001208040 सुविधांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे ग.पां. चिमणकर यांनी केले आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविण्याता विभागार्फत महास्वयंम www.mahaswayam.gov.in पोर्टलच्या विविध लाभार्थी घटक (स्टेक होल्डर्स) जसे उमेदवार, उद्योजक, नियोक्ते यांना या संकेतस्थळावर नोंदणी करणे, नोंदणीचे अद्यायावत करणे, रिक्तपदे अधिसुचित करणे, रिक्तपदास अनुसरुन ॲप्लाय करणे,राज्यातील युवक- युवती व विद्यार्थी यांना करिअर विषयक संधीची माहिती, रोजगार मेळावे व रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम यामध्ये इच्छुकता दर्शविणे, विविध प्रशिक्षण संस्था, स्टार्टअप इ. विविध ऑनलाईन सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या ऑनलाईन सेवा घेतांना लाभार्थी घटकांना येणाऱ्या अडचणी, तक्रारीचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री हेल्पलाईन अंतर्गत दि. 18 ऑगस्ट 2023 पासून हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. या हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक 18001208040 असा आहे. या हेल्पलाईनची वेळ सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत अशी आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'