राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 954 प्रकरणे निकाली

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का.): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशांप्रमाणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतमध्ये जिल्ह्यातून 288 प्रलंबित व 666 वादपूर्व अशी एकूण 954 प्रकरणे निकाली काढण्यात आली. एकूण रक्कम रुपये ३,७८,९४,८९०/- ची वसूली, तडजोड झाली, असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी दिली. यावेळी जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग- ओरोस येथे राष्ट्रीय लोकअदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका, जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरीक्त सत्र न्यायाधीश एस. एस. जोशी, जिल्हा न्यायालय 2 व अतिरीक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. बी. कुरणे, दिवाणी न्यायाधीश (व-स्तर) एस. के. कारंडे तसेच विधीज्ञ ए. ए. शेख, विधीज्ञ वाय. आर. खानोलकर हे उपस्थित होते. पक्षकारांनी मोठ्या संख्येने राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सहभाग घेतला. जिल्हा न्यायाधीश 1 एस. एस. जोशी यांच्या पॅनेल तर्फे जिल्हा न्यायालयात मोठया प्रमाणात प्रकरणे निकाली झाली व उच्चांकी रकमेची तडजोड झाली. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हयातील विधीज्ञांनी उत्साहाने सहभाग घेतला. राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी व न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच सर्व तालुका विधी सेवा समितीचे अधिकारी व कर्मचारी, अन्य शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'