मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना कार्यक्रमांतर्गत 6 मतदान केंद्राचे प्रस्ताव प्राप्त सूचना किंवा हरकत घ्यायची असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि 25 (जिमाका) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि.०१.०१.२०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचना करण्‍याबाबत भारत निवडणूक आयोगानी निर्देश दिलेले आहेत. त्‍याअनुषंगाने दि.२२.०८.२०२३ ते दि.२९.०९.२०२३ या कालावधीत मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व पुनर्रचना कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्‍हयातील तीनही विधानसभा मतदार संघात राबविण्‍यात आलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने सदर कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण करताना मतदान केंद्रातर्गत मतदारांच्‍या संख्‍येबाबत स्‍पष्‍टीकरण तसेच एका मतदान केंद्रातर्गत जास्‍तीत जास्‍त 1500 मतदारांच्‍या आधारे करण्‍यात यावे, तसेच शक्‍य असेल तिथे मतदान केंद्र असलेल्‍या ज्‍या इमारती खराब झालेल्‍या आहेत किंवा मोडकळीस आलेल्‍या आहेत अशा मतदान केंद्राची पाहणी करण्‍यात आली असून विधानसभा मतदार संघातील अधिनस्‍त तालुक्‍यातील प्रत्‍येक मतदान केंद्रावर सर्व मुलभूत किमान सुविधा (AMF) उपलब्‍ध आहेत अगर कसे याबाबतची खात्री करण्‍यात आलेली असून त्‍यानुसार जिल्‍हयातून मतदान केंद्राचे सुसुत्रकीरण व पुनर्रचना कार्यक्रमांतर्गत एकूण 6 मतदान केंद्राचे प्रस्‍ताव प्राप्‍त झालेले आहेत, त्‍याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. विधानसभा मतदार संघाचे नांव मतदान केंद्राच्या, वाडीच्या नावात बदत मतदान केंद्राच्या स्थानात बदल नवीन मतदान केंद्र प्रस्तव 268- कणकवली 0 0 1 269- कुडाळ 2 2 0 270- सावंतवाडी 0 1 0 एकूण 2 3 1 वरील मतदान केंद्राच्‍या सुसुत्रीकरण व पुनर्रचना प्रस्‍तावाच्‍या अनुषंगाने सर्व विधानसभा मतदार संघाच्‍या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून जिल्‍हाधिकारी व जिल्‍हा निवडणूक अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयास प्रस्‍ताव सादर करण्‍यांत आलेले असून त्‍याबाबतची प्रारूप मतदान केंद्राची यादी Sindhudurg.nic.in या संकेतस्‍थळावर तसेच मतदार नोंदणी अधिकारी, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, देवगड , वैभववाडी, कणकवली , कुडाळ, मालवण, वेंगुर्ला , सावंतवाडी, दोडामार्ग या कार्यालयाचे सूचना फलकावर प्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे. प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या प्रारूप मतदान केंद्राच्‍या यादीबाबत मान्‍यताप्राप्‍त राजकीय पक्षाच्‍या प्रतिनिधी यांना सूचना किंवा हरकत घ्‍यायची असल्‍यास मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कणकवली , कुडाळ , सावंतवाडी तसेच जिल्‍हाधिकारी सिंधुदुर्ग ( निवडणूक शाखा ) येथे 2 ऑक्टोंबर 2023 पर्यंत नोंदवू शकता. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'