टपाल विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या 'दिन दयाळ स्पर्श' शिष्यवृत्तीसाठी 8 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करा

सिंधुदुर्गनगरी, दि.5 (जि.मा.का.) : टपाल विभागातर्फे फिलाटेली हा छंद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या 'दिन दयाळ स्पर्श' शिष्यवृत्ती योजनासाठी इ.6 वी व इ.9 वी मध्ये शिकणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज 8 सप्टेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधिक्षक मयुरेश कोले यांनी केले आहे. विद्यार्थ्यांची फिलाटेली (टपाल तिकीट संकलन) आवड वृध्दिंगत व्हावी यासाठी टपाल विभागाने 'दिन दयाळ स्पर्श' योजना हा शिष्यवृती कार्यक्रम सुरू केला आहे. इयत्ता सहावी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये छंद म्हणून फिलाटेतीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उदेश आहे. ही शिष्यवृती मंडळ कार्यालय मुंबईद्वारे आयोजित फिलाटेली क्विज आणि फिलाटेली प्रकल्पावर आधारित आहे. योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृती रक्कम रु 6000/- असून दर महा रु.500/- )आहे. विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त शाळेत (इयत्ता सहावी ते नववी) प्रवेश घेणे आवश्यक आहे. शाळेत फिलाटेली क्लब असावा आणि विद्यार्थी क्लबचा सदस्य असावा. जर शाळेत फिलाटेली क्लब नसेल तर स्वतःचे फिलाटेली डिपॉझिट खाते असलेले विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या अंतिम परीक्षेत किमान 60 टक्के गुण मिळालेली असावे (एससी / एसटी उमेदवारांना 5 टक्के सूट) यासाठीचे अर्ज 8 सप्टेंबरपर्यंत स्वीकारले जातील. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा डाक अधीक्षक टपाल कार्यालय, सिधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी 416812 या पत्यावर पाठवावेत. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी या योजनेमध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02362 -228520 येथे संपर्क साधावा. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'