गणेशोत्सव काळात उचपार व निदान पथके तैनात
सिंधुदुर्गनगरी, दि.6 (जि.मा.का.) : गणेशोत्सवासाठी मुंबई परिसरातून आणि पर जिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरीकांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख बस स्थानके, रेल्वेस्टेशन व चेकपोष्ट येथे दि. 15 ते 18 सप्टेंबर 2023 या कालावधीत उपचार व निदान पथकाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
दि. 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेशोत्सव असल्याने आरोग्य विभागाकडून भाविकांना पुढीलप्रमाणे सेवा देण्यांत येत आहेत. आरोग्य विभागामार्फत रेल्वेस्टेशन व बसस्टॅण्ड, तसेच चेकपोष्ट या ठिकाणी आरोग्य पथके नेमण्यात येत आहेत.
ही पथके दि. 15 सप्टेंबर 2023 ते 18 सप्टेंबर 2023 पर्यंत कार्यान्वीत ठेवण्यात येत आहेत. रेल्वेस्टेशनवरील पथके रेल्वे वेळापत्रकानुसार तैनात असतील. एस.टी. स्टॅण्डवरील पथके सकाळी 8 ते दु. 2 व दु. 2 ते रात्री 8 अशा दोन सत्रात दि. 15 सप्टेंबर पासून कार्यान्वित राहतील.प्रत्येक पथकामध्ये किमान दोन आरोग्य कर्मचारी (स्त्री/पुरुष) नियुक्त करण्यात येतील. प्रत्येक पथकाच्या ठिकाणी डेंग्यू, मलेरीया, लेप्टोस्पायरोसिस व कोव्हीड-19 या आजाराबाबतचे आरोग्य शिक्षण देण्यात येईल. वरील पथकाबाबतचे सनियंत्रण तालुकास्तरावरुन करण्यात यावे यासाठी तालुका स्तरावरील आरोग्य सहाय्यक / आरोस पर्यवेक्षक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून देण्यात येईल. सदर पथकाडे क्लोरोक्वीन, पॅरासिटेमॉल डॉक्झीसायक्लीन, अॅन्टी डायरीअल गोळ्या तसेच रक्त नमुना स्वॅब व घेण्यासाठी आवश्यक सामुग्रीची किटची व्यवस्था
केलेली आहे.
रेल्वेस्टेशन किंवा एस.टी. स्थानकावर गेल्या प्रवाशापैकी ज्यांना ताप, अंगदुखी,डोकेदुखी अतिसार व फल्यू अशा प्रकारची लक्षणे असल्यास सदर पथकामार्फत औषधोपचार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पथकामध्ये हिवताप, डेंग्यू, चिकूनगुन्या, कावीळ, लेप्टोस्पायरोसीस अशा प्रकारच्या लक्षणांच्या रुग्णांना उपचार दिल्यानंतर रुग्णाचा सद्याचा तात्पुरता व कायमचा पत्ता याची नोंद करण्यात येणार आहे. जेणेकरून या रुग्णांचा पाठपुरावा करणे सुलभ होईल.
०००००
Comments
Post a Comment